*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामस्वच्छता अभियानात केर-भेकुर्ली, आडाळी व तळेखोलचा गौरव*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२५–२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद प्रभागांमधून ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले.
साटेली–भेडशी जिल्हा परिषद प्रभागातून सहभागी झालेल्या ११ ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत केर-भेकुर्लीची निवड करण्यात आली. मणेरी प्रभागातील १३ ग्रामपंचायतींमधून ग्रामपंचायत आडाळी तर माटणे प्रभागातील १२ ग्रामपंचायतींमधून ग्रामपंचायत तळेखोल यांची उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे निवड झाली आहे.
स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून गावांमध्ये आरोग्यदायी व स्वच्छ वातावरण निर्माण केल्याबद्दल निवड झालेल्या सर्व ग्रामपंचायतींचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या यशामुळे इतर ग्रामपंचायतींनाही स्वच्छतेच्या चळवळीत अधिक सक्रिय सहभागासाठी प्रेरणा मिळणार आहे.
निवड झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर म्हणून प्रत्येकी ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी दिली.

