*वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सावंत, पार्थ सामंत आणि वीणा गावडे प्रथम*

*वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सावंत, पार्थ सामंत आणि वीणा गावडे प्रथम*

*कोंकण एक्सप्रेस*

*वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सावंत, पार्थ सामंत आणि वीणा गावडे प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

शिवजयंतीनिमित्त बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे गुणवत्ता हमी कक्ष व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सावंत, पार्थ सामंत आणि वीणा गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दिलीप शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नॅक समन्वयक प्रा.एस.एच.माने, संस्था प्रतिनिधी प्रा.विरेंद्र चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी विवेक चव्हाण आदी उपस्थित होते. ग्रंथपाल शुभदा माने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. शालेय गटात प्रथम-पार्थ सावंत (आर.पी.डी.सावंतवाडी), द्वितीय-हर्षांक टेमकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), तृतीय-भूमी परूळकर (वेताळ विद्यामंदिर, तुळस), उत्तेजनार्थ – तनिष्का केळुसकर आणि वृषाली वर्पे (वेंगुर्ला नं.1), शालेय गटात प्रथम – पार्थ सामंत (टोपीवाला हायस्कूल, मालवण), द्वितीय-अस्मि मांजरेकर (आर.पी.डी.सावंतवाडी), तृतीय-यज्ञेश शिंदे (नेमळे हायस्कूल), उत्तेजनार्थ – अदिती चव्हाण (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन) आणि गाथा कोळंबकर (न्यू इं.स्कूल उभादांडा) यांनी तर खुल्या गटात प्रथम – वीणा गावडे (पेंडूर), द्वितीय-संग्राम कासले (मालवण), तृतीय-सविता वाळके (कुडाळ), उत्तेजनार्थ – साक्षी राणे आणि अंकिता पाटील – नाईक यांनी पटकाविले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रगती चव्हाण, प्रा.बाबूराव खवणेकर, ग्रंथपाल प्रा. शुभदा माने, प्रा.प्रियंका प्रभू, प्रा.सीमा सावंत व प्रा.हराळे यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणापत्र तसेच बॅ.बी.के.कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना रंगोली स्क्रीन पिं्रटर्स यांच्यावतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य धनराज गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन डॉ. सचिन परूळेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. पी. एम. देसाई व प्रा. पी. जी. देसाई यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!