*कोंकण एक्सप्रेस*
*कळणेतील नूतन विद्यालयात शिवजयंतीनिमित्त रंगली चित्रकला स्पर्धा*
*दोडामार्ग : शुभम गवस*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत नूतन विद्यालय कळणे येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक, युद्धनीती, महाराजांचा दरबार, तसेच गड-किल्ल्यांचे देखावे अशा विविध ऐतिहासिक विषयांवर आकर्षक चित्रे साकारत आपल्या कल्पकतेची झलक दाखवली.
स्पर्धेचे आयोजन शिक्षक संजय तायवाडे यांनी केले होते, तर स्पर्धेला प्रशालेचे कर्मचारी मधुकर गावकर यांनी प्रायोजकत्व दिले.
निकालात लहान गटात हर्षाली विष्णू नार्वेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर प्रसाद प्रकाश देसाई याने द्वितीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात मयुरी रामचंद्र गावकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर उर्वी संदेश देसाई हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ व उमेश देसाई यांनी केले. यावेळी शिक्षक सतीश धर्णे, अच्युत गावडे तसेच शिक्षिका निकिता सावंत आदी उपस्थित होते.

