लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिनांक १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान कलारंग महोत्सवाचे आयोजन

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिनांक १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान कलारंग महोत्सवाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिनांक १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान कलारंग महोत्सवाचे आयोजन*

*कणकवली / प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिनांक १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसा क्रिकेटचा थरार आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यात नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कणकवली तालुक्यातील हळवल परबवाडी येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील २० वर्ष सातत्याने सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हा वर्षी मंडळाचे २१ वे वर्ष असल्याने क्रीडारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार असून दिवसभर गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री क्रीडारंग महोत्सवाचा शुभारंभ केला जाणार असून रात्री बुवा सुजित परब व बुवा अखिलेश फाळके यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. शुक्रवार २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान एक तालुका एक संघ हा धर्तीवर कै प्रमोद परब स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. तर २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तर रविवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना व पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील २० वर्ष सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून सामाजिक बांधिलकी जपत हे मंडळ आज ही कार्यरत आहे. १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या कलारंग महोत्सवास जिल्हा वासियांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!