*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळे (मधलीवाडी) येथे १९ फेब्रुवारीला भव्य शिवमहोत्सव; मिरवणूक व दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन…*
*दोडामार्ग :शुभम गवस*
शिवजयंती निमित्त पिकुळे-मधलीवाडी येथील श्री गणेश मंदिर परिसरात गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वीर मराठा मंडळ पिकुळे (मधलीवाडी) यांच्या वतीने भव्य-दिव्य शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता शिवमुर्ती पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता पिकुळे मंदिरापासून दोडामार्ग-भेडशीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या घोषणांनी ही मिरवणूक दिमाखात पार पडणार आहे.
दुपारी १.०० वाजता शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ८.०० वाजता वीर मराठा मंडळ पुरस्कृत श्री गणेश दशावतार नाट्य मंडळ, पिकुळे (मधलीवाडी) यांचा ‘शतक्रिव संहार’ हा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून शिवमहोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

