*कोंकण एक्सप्रेस*
*रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार.*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प चे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.च्या विजयी उमेदवार सौ. प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जि.का.का.सदस्य व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला . यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे , शिरोडा मा.सरपंच मनोज उगवेकर उपस्थित होते .
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो . प्रीतेश राऊळ यांनी सलग दुसर्या वेळी या मतदार संघातुन विजय मिळवला . तसेच त्यांनी मागच्या टर्म मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून चांगली कामगीरी बजावली , त्यामुळेच मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा मोठ्ठ्या मताधिक्यांने निवडुन दिले .
तसेच रेडी पंचायत समीती मतदार संघातुन नवख्या असलेल्या सौ.प्रियांका घाटवळ ह्या संघटनेच्या ताकदीवर निवडुन आल्या . त्यांना पण स्थानिक केरवाडा ग्रामस्थांची साथ लाभली . ह्या दोन्हीही विजयी उमेदवारांचा सत्कार रेडी व शिरोडा – केरवाडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला .
यावेळी नितीन तारी , पांडुरंग घाटवळ , शंकर घाटवळ , गोपाळ बटा , नारायण मोरजे उपस्थित होते .

