*कोकण Express*
*तर पळताभुई थोडी करू; मिलिंद मेस्त्री यांचा शिवसेनेला इशारा!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पक्षामध्ये कोण प्रवेश करण्यासाठी आमच्या नेत्यांना भेटत असेल, त्यामुळे आमचा पक्ष मजबूत होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. कालच्या भेटी बद्दल कोणीही भाजपाला आव्हान देऊ नये. अन्यथा त्यांची पळताभुई थोडी करू असा इशारा भाजपाचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी शिवसेनेला दिला आहे. कोवीड च्या काळात आम्ही राजकारण करू इच्छित नाही असेही मेस्त्री यांनी म्हटले आहे.