महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या संचालकपदी विठ्ठल देसाई यांची निवड

महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या संचालकपदी विठ्ठल देसाई यांची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या संचालकपदी विठ्ठल देसाई यांची निवड*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल देसाई यांची महाराष्ट्र राज्य मजूर संघ मर्या. पूणे या संघावर निमंत्रित संचालक म्हणून निवड झाली आहे.
सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व म्हणून विठ्ठल देसाई यांना ओळखले जाते. माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय असलेले विठ्ठल देसाई हे सहकार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रीय आहेत. सध्या ते सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष तसेच कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे काम केले आहे. सहकारातील उत्तम जाणकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना आता राज्यस्तरावर सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या निमंत्रित संचालक पदी निवड झाल्याने विठ्ठल देसाई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!