कणकवलीत भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारणार

कणकवलीत भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारणार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारणार*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून शासकीय मान्यता प्राप्त; ८ कोटीची तरतुद*

*कणकवली ः संजना हळदिवे*

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहुर्तावर पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार भूमिपूजन ;
छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यासह अद्ययावत नाट्यगृह राहणार उभे
सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती

कणकवली शासकीय विश्रामगृह येथे नियोजनाची बैठक संपन्न

कणकवली:
मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारा कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी समाजाचे नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. शहरातील २८ गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यांत ८ कोटी रुपये खर्च करुन हे सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे. या मराठा सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या भवनामध्ये छोटे सभागृह, अद्ययावत नाट्यगृह, आर्ट गॅलरी, निवास व्यवस्था, प्रवेशद्वारावर अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पार्किंग व्यवस्था, गार्डन उभारण्यात येणार असून या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत , लवू वारंग , सतीश सावंत यांनी दिली.
कणकवली तालुका सकल मराठा समाज वतीने मराठा सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रम नियोजनाची बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. त्यानंतर मराठा समाज नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत भवनाबद्दल माहिती दिली.
एस.टी. सावंत म्हणाले, कणकवली तालुक्यातील मराठा समाजाची मराठा सांस्कृतिक भवन व्हावे अशी इच्छा होती. पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ही मागणी आम्ही केली होती. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक , कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत हे भवन व्हावे असे सुचित केले होते, त्यानुसार अद्ययावत असे मराठा सांस्कृतिक भवन होत असल्याचा आम्हाला आनंद आहे.

लवू वारंग म्हणाले , आपल्या सर्वच मराठा समाजाची मराठा सांस्कृतिक भवन व्हावे, या मागणीप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांनी हे भवन मंजूर केले आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करत आहोत.

सतीश सावंत म्हणाले , कणकवली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणारे मराठा सांस्कृतिक भवन हे खरोखरच आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सांस्कृतिक भवनात 500 बैठक व्यवस्था असणारे नाट्यगृह , छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा अश्वारुढ पुतळा , 150बैठक व्यवस्था असलेला मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र , महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेता येईल असे सभागृह असणार आहे.
या मराठा सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रम नियोजनासंदर्भात प्रास्ताविक संतोष राऊळ यांनी करत भवनाची संकल्पना मांडली. मराठा समाजाच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांचे कार्यालयीन प्रमुख अजयकुमार सर्वगोड , आर्किटेक्ट अमोल नष्टे यांनी तांत्रिकदृष्ट्या भवनाबाबत माहिती दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक,बॅंक संचालक समीर सावंत, पंचायत समिती सदस्य सोनू सावंत , संतोष राऊळ, अर्जुन राणे ,भाई परब, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत, महेश सावंत, बच्चू प्रभुगांवकर , ॲड. अभिजीत सावंत, संदीप राणे , सुशील सावंत, दिलीप तळेकर, प्रदिप सावंत, अनुप वारंग, सुहास राणे, बाबु राऊळ, बाबाजी चव्हाण, दत्ता काटे, संदिप साटम, दामू सावंत, अनिल बागवे,अमोल रासम, औदुंबर राणे, अविनाश राणे, गुरु शिंदे, राजेश जाधव, संजय देसाई, भगवान लोके, भालचंद्र साटम, राजू रावराणे, पवन भालेकर, लोरे सरपंच अजय रावराणे, तुषार सावंत, संतोष परब, प्रदिप गावडे, बबली राणे , राजू राणे,प्रदीप राणे , सोमनाथ गायकवाड , दिलीप साटम , आनंद साटम , सुधीर राणे , अजित सावंत , रमाकांत राऊत, अमित दळवी आदींसह तालुक्यातील मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो – कणकवली येथील शासकीय विश्रागृहात मराठा सांस्कृतिक भवनाबाबतची माहिती मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत , लवू वारंग , सतीश सावंत आदी नेत्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!