*कोंकण एक्सप्रेस*
*हर हर महादेवच्या जयघोषात श्री रामे·ाराचा रथोत्सव संपनन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
महाशिवरात्री निमित्त वेंगुर्ला येथील श्री देव रामे·ाराचा रथोत्सव मोठ¬ा उत्साहात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाल. रथ मिरवूणकीवेळी भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला.
येथील ग्रामदैवत श्री रामे·ार मंदिरात दास नवमीपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला होता. 13 फेब्राुवारी रोजी श्री रामे·ार दशावतार नाट¬ मंडळाचा “भिमकी हरण’ हा नाट¬प्रयोग तर 14 रोजी दत्त प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला यांचे भजन संपन्न झाले. 15 रोजी महाशिवरात्री दिवशी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात उपस्थित राहत अभिषेक-एकादशणी करणे, केळी-नारळ ठेवणे, बिल्वपत्र अर्पण करणे आदी धार्मिक सेवा केली. रात्री सातेरी मंदिरातून तरंगदेवतांचे आगमन झाल्यावर श्री रामे·ाराची पालखी तसेच लालखी मिरवणूक संपन्न झाली. त्यानंतर रथावर उत्सव मूर्ती ठेवून त्याची पूजा करण्यात आली. अवसारी देवतेकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. मंदिर परिसरासह पिंपळवृक्षाला प्रदक्षिणा घालून पुन्हा रथ मंदिरासमोर आणण्यात आला. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट¬ मंडळाच्या नाट¬प्रयोगाने उत्सवाची सांगता झाली.

