जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

*कोकण Express*

*जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट!*

*कोरोनोच्या पार्श्वभूमीवर रुग्णासाठी होत असलेले लसीकरण, होम आसोलेशन, रँपिड टेस्ट या संदर्भात घेतला आढावा!*

*बांदा  ः प्रतिनिधी*

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत लसिकरण, रँपिड टेस्ट, होम आसोलेशन या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतला आढावा.

यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जि.प सदस्या श्वेता कोरगावकर, उपसभापती सावंतवाडी शीतल राऊळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.वर्षा शिरोडकर, बांदा सरपंच अक्रम खान, पं स.सभापती सावंतवाडी निकीता सावंत, महीला बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर, गट विकास अधिकारी व्ही.एम नाईक, वित्त बांधकाम सभापती महेद्र चव्हाण, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँ. जगदीश पाटील, डाँ.मयुरेश पटवर्धन, ग्रा.प सदस्य शाम मांजरेकर, मकरंद तोरस्कर, दोडामार्ग वैद्यकीय अधिकारी रमेश करतोसकर आदि उपस्थित होते.

डाँक्टर जगदीश पाटील यांनी आतापर्यंत झालेले लसीकरण, होम आयसोलेशन रुग्णांसंदर्भातील माहिती दिली. बांदा प्राथमिक आरोग्य क्रेंदात रोज रुग्णांची संख्या जास्त असुन अपुऱ्या कर्मचा-यामुळे अतिरिक्त ताण होत असल्याचे जि.प अध्यक्षा संजना सावंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

यासंदर्भात अध्यक्षा यांनी कर्मचारी वर्ग देण्याचे आश्वासन दिले. तसेच सिंधुदुर्ग मधून गोवा राज्यात कामानिमित्त जाणाऱ्या युवकांची संख्या १४ हजार च्या आसपास आहे. यांची पंधरा दिवसानंतर रँपिड टेस्ट करण्यात यावे. तसेच रोज गोवा बाँर्डरवर तापमान, आँक्सिजन लेव्हल चेक करुनच महाराष्ट्रत सोडण्यात यावे अशा सुचना आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या. अध्यक्षा संजना सावंत यांनी प्रा.आरोग्य केंद्रांच्या नुतन इमारतीच्या सुरू असलेल्या कामाची पहाणी केली. औषधोपचार साठा मुबलक असावा असे सुचित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!