विलास गांवकर यांचे निधन

विलास गांवकर यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*विलास गांवकर यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कलमठ नाडकर्णी नगर येथील विलास साबाजी गांवकर (61) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने टिटवाळा , मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या दुर्धर आजारावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याने सध्या ते टिटवाळा येथे राहावयास होते. अंत्यसंस्कार शनिवारी सायंकाळी उशिरा टिटवाळा येथे करण्यात आले. कणकवली येथे वास्तव्य असताना ते साई लस्सी कॉर्नर नावाने लस्सीचे दुकान चालवीत होते.बोलके असलेल्या विलास यांचा मित्रपरिवार मोठा होता. पत्रकार विजय गांवकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत. रेड सॉईल स्टोरीज नावाने प्रसिद्ध असलेल्या पूजा गांवकर गवस यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा , मुलगी आणि नात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!