*कोंकण एक्सप्रेस*
*काशिकलेश्वर मंदिरात आज महाशिवरात्र उत्सव*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशिकलेश्वर मंदिरात रविवार १५ ते १६ फेबु्रवारी दरम्यान महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी ८. ३० ते दुपारी १२ यावेळेत अभिषेक, सायंकाळी ५ ते ७ यावेळेत भजनांचा कार्यक्रम, सायं. ७ वा. गायक मनोज मेस्त्री यांच्या गायनाचा कार्यक्रम, ९.३० वा. भजनांचा कार्यक्रम होईल. सोमवार सकाळी ६ वा. देवांची आंघोळ, दुपारी १.३० वा. महाप्रसाद. तरी सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव काशिकलेश्वर देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

