*कोंकण एक्सप्रेस*
*मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*कणकवली ः संजना हळदिवे*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०.४५ वा. मुंबई येथून मोटारीने जुहू विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. पवनहंस, जुहू विमानतळावरून हेलिकॉप्टरने (VT-DBH) देवगडकडे प्रयाण, दुपारी १२.१५ वा. एस. एच. केळकर कॉलेज, देवगड येथे हेलिकॉप्टरने आगमन, दुपारी १२.३० वा. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे (दक्षिण काशी) यात्रा निमित्त दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, दुपारी १.३० वा. मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी २.०० वा. एस. एच. केळकर कॉलेज येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, दुपारी ३.१५ वा. पवनहंस, जुहू विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने अधिश निवासस्थान येथे प्रस्थान केले जाईल, असा दौरा संपन्न होणार आहे.

