*कोकण Express*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गोवा “बॉर्डर” आजपासून “सील” …*
*रॅपिड टेस्ट नंतरच प्रवेश;महसूल पोलीस व आरोग्य विभागाची पथके तैनात*
*बांदा ः प्रतिनिधी*
बांदा,ता.२१: कोरोनाच्या वाढते रुग्ण लक्षात घेता,आज पासून महाराष्ट्र-गोवा सीमा महसूल,पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आली.गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.चाचणी नंतरच प्रवेश देण्यात येत आहे.
राज्य शासनाने गोव्यासह इतर सहा राज्ये ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे टोल नाक्यानजिक सीमा आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे. याठिकाणी महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तैनात असून गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांच्यासह महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.