*कोंकण एक्सप्रेस*
*अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री साईनाथ खोत*
*सिंधुदुर्ग*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री साईनाथ खोत यांची निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे पक्षप्रमुख मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष { कोकण विभाग } पदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील श्री साईनाथ खोत यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष शिवभक्त हर्षद नेगिनहाळ यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली, श्री साईनाथ खोत यांच्या सक्रिय कार्याची दखल घेउन अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी { कोकण विभाग } पदी निवड करण्यात आली आहे

