१ मार्च २०२६ रोजी जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पिकुळे नं. ३ चा सुवर्ण महोत्सव; नियोजन बैठक संपन्न..

१ मार्च २०२६ रोजी जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पिकुळे नं. ३ चा सुवर्ण महोत्सव; नियोजन बैठक संपन्न..

*कोंकण एक्सप्रेस*

*१ मार्च २०२६ रोजी जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पिकुळे नं. ३ चा सुवर्ण महोत्सव; नियोजन बैठक संपन्न…*

*दोडामार्ग: शुभम गवस*

जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पिकुळे नं. ३ च्या ५० व्या सुवर्ण महोत्सवानिमित्त १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी नियोजन बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत कार्यक्रमाची रूपरेखा, आर्थिक नियोजन तसेच मान्यवरांना निमंत्रण देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुवर्ण महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, निधी उभारणी करणे तसेच माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे याबाबत उपस्थितांनी सूचना मांडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीस लक्ष्मण गवस, माजी शालेय समिती अध्यक्ष जयवंत गवस, तंटामुक्त अध्यक्ष धनेश गवस, आप्पा गवस, भिकाजी तर्पे, रामा गवस, किशोर गवस, उत्तम गवस, समीर गवस, सुभाष सावंत, लवू गवस, नितू साळकर, शालेय समिती अध्यक्षा रेश्मा गवस, कॅप्टन फटी गवस यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना व आभार प्रदर्शन माजी सैनिक सुभेदार मेजर विठ्ठल गवस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!