पतंजली योग समिती कणकवली सिंधुदुर्ग यांच्यावतीने कॉलेज कणकवलीच्या मैदानावर भव्य निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन

पतंजली योग समिती कणकवली सिंधुदुर्ग यांच्यावतीने कॉलेज कणकवलीच्या मैदानावर भव्य निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*पतंजली योग समिती कणकवली सिंधुदुर्ग यांच्यावतीने कॉलेज कणकवलीच्या मैदानावर भव्य निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधी*

पतंजली योग समिती कणकवली सिंधुदुर्ग यांच्यावतीने कणकवली कॉलेज कणकवलीच्या मैदानावर भव्य निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिराच्या प्रथम दिवशीचा उद्घाटन समारंभ पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी श्री चंद्रशेखर खापणे ,ज्येष्ठ योगशिक्षक श्री .पालेकर व भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ .रावराणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी श्री पाटणकर किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी रविंद्र पावसकर व युवा समिती सिंधुदुर्गचे जिल्हा प्रभारी डॉ.प्रशांत परब उपस्थित होते .
सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेल्या या शिबिराची सुरुवात ऊँकार साधने ने करण्यात आली . त्यानंतर उपस्थितां कडून विविध योगासने व प्राणायामांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली .यावेळी कुडाळ तालुका प्रभारी योगेश गवंडे , सावंतवाडी तालुका प्रभारी बाबली गावंडे , भारत स्वाभिमान कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर उपस्थित होते .बाबली गावंडे यांनी विधीपूर्वक होम हवन यज्ञ करून उपस्थित वातावरण भक्तीमय केले .या शिबिराचा लाभ कणकवली शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला . या शिबिराला पहिल्याच दिवशी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला .शिबिराचे व्यासपीठ संचालन श्री चंद्रशेखर खापणे व श्री विद्याधर पाटणकर यांनी केले .यावेळी उपस्थित साधकांना कणकवली येथील योगशिक्षक श्री.किसन ठोंबरे , श्री . सकपाळ,श्री. लिमये ,श्रीमती साधना गुरव, श्रीमती नीता सावंत ,ज्येष्ठ योग शिक्षक मोहन सावंत तसेच कुडाळ येथील योगशिक्षक श्री . गुरुनाथ सावंत श्री.रामचंद्र कामुलकर व श्रेया बांदेकर यांनी योगाभ्यास करण्यासाठी विशेष मदत केली .या शिबिराचे सूत्रसंचालन महिला पतंजली योग समितीच्या प्रभारी .श्रीमती रश्मी आंगणे यांनी केले तसेच आभार महिला पतंजली सिंधुदुर्गच्या महामंत्री श्रीमती प्रिया कोचरेकर यांनी मानले .या शिबिराला कणकवली कॉलेज , विद्यामंदिर हायस्कूल , नगरपंचायत कणकवली तसेच रोटरी क्लब कणकवली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे .15 फेब्रुवारी पर्यंत या शिबिरामध्ये विविध प्रकारचे आसने, प्राणायाम ध्यान-धारणा , हस्तमुद्रा व मन:शांतीसाठी विविध योगाभ्यास घेण्यात येणार आहे .तसेच आयुर्वेदिक मार्गदर्शन लाभणार आहे . तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योग समिती कणकवली यांच्यामार्फत करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!