*कोकण Express*
*सांगूळवाडी कोविड सेंटरला शिवसेना सदैव मदतीचा हात देणार!*
*शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिली सांगूळवाडी कोविड सेंटरला भेट!*
*वैभववाडी तालुका सेनेच्या वतीने ५०० गावठी अंड्याचे वाटप!*
*महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग समन्वय साधून करतेय काम!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला होता. सध्या वैभववाडी तालुक्यात २२६ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची सेवा व त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. वैभववाडी तालुका शिवसेनेना सांगूळवाडी येथील कोरोना रुग्णांसाठी घोषणा न करता मदतीचा हात सदैव दिला जाईल, असे आश्वासन शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले.
सांगूळवाडी कोविड सेंटरमध्ये उपाचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना वैभववाडी तालुका शिवसेनेना पक्षाच्यावतीने सकस आहार म्हणून ५०० गावठी अंडी देण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, नावळे माजी सरपंच संभाजी रावराणे, माजी जि. प.सभापती संदेश सावंत – पटेल, बंडू सावंत, देवानंद पालांडे, स्वप्नील धुरी, नितीन रावराणे, सत्यवान सुतार, सांगूळवाडी माजी सरपंच सुतार, तहसीलदार रामदास झळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, डॉ. मंदार पाटोळे, नायब तहसीलदार ए.के.नाईक, मंडळ अधिकारी पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अनिल पवार म्हणाले, तालुक्यात गेले दोन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या निम्याने कमी झाला आहे. दिगशी गावात सुमारे 100 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते. सध्या 50% रुग्ण बरे झाले आहेत.
तहसीलदार रामदास झळके म्हणाले, तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग समन्वय साधून काम करत आहेत.