*कोंकण एक्सप्रेस*
*जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कु .सावी मुद्राळे हिचा सत्कार सोहळा संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती प्रजासत्ताक दिनी संरक्षण मंत्रालयाकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलेल्या कु.सावी वैभव मुद्राळे हिचा जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, संस्था कार्यअहवाल,भगवत गीता व विशेष आकर्षक सन्मानपत्राने सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्गची लेक सावी मुद्राळे हिची गगनभरारी,सावीच्या कर्तृत्वाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली आहे . यावेळी जनजागृती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरफणकर,गंधाली तिरफणकर,अभिनेत्री अक्षता कांबळी, खारेपाटण येथील उद्योजक प्रवीण लोकरे, सत्यवान धुमाळे, पत्रकार निकेत पावसकर,श्रावणी मधभावे, अनिल कांबळी, सावी चे कुटुंबीय उपस्थित होते.

