दोडामार्गात महायुतीचा दणदणीत विजय; विजयी उमेदवारांची विशाल परब यांना सदिच्छा भेट..

दोडामार्गात महायुतीचा दणदणीत विजय; विजयी उमेदवारांची विशाल परब यांना सदिच्छा भेट..

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गात महायुतीचा दणदणीत विजय; विजयी उमेदवारांची विशाल परब यांना सदिच्छा भेट..*

*दोडामार्ग: शुभम गवस*

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यात भाजप-शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सावंतवाडी येथे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांची सर्व विजयी उमेदवारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.
या निवडणुकीत भाजपाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख तथा माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झालेले रामा उर्फ दीपक गवस, तसेच मणेरी व साटेली-भेडशी मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या विजयाबद्दल विशाल परब यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व विजयी उमेदवार बोलताना म्हणाले की, विशाल परब जेव्हा-जेव्हा दोडामार्गात येतात, तेव्हा तालुक्यात सकारात्मक परिवर्तन घडून येते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयही त्याचाच परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विशाल परब यांचे सर्वांनी आभार मानले.
या प्रसंगी विजयी उमेदवार रामा उर्फ दीपक गवस, संजय सातार्डेकर, अंकुश उर्फ भैया नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, रंगनाथ गवस, देवा शेटकर, शिरीष नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!