कोनाळ मतदारसंघात अपक्ष साक्षी देसाई यांची दमदार लढत; दुसऱ्या क्रमांकावर उल्लेखनीय कामगिरी..

कोनाळ मतदारसंघात अपक्ष साक्षी देसाई यांची दमदार लढत; दुसऱ्या क्रमांकावर उल्लेखनीय कामगिरी..

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळ मतदारसंघात अपक्ष साक्षी देसाई यांची दमदार लढत; दुसऱ्या क्रमांकावर उल्लेखनीय कामगिरी..*

*दोडामार्ग: शुभम गवस*

कोनाळ मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांनी अत्यंत दमदार लढत देत मतदारांची मने जिंकली. विजयाचा क्षण थोडक्यात हुकला असला तरी त्यांनी दुसरा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
निवडणुकीच्या रणांगणात कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना साक्षी देसाई यांनी केवळ जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवली. गावोगावी जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. त्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
आज एका अपक्ष उमेदवाराने स्वाभिमानाने लढा देत केवळ जनाधारावर इतक्या मोठ्या संख्येने मते स्वतःकडे खेचून घेतली, यावरून मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निकालात त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या असल्या तरी त्यांच्या लढ्याने अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. पराभव स्वीकारत त्यांनी मतदारांचे आभार मानले असून, जनतेसाठी काम करण्याची आपली बांधिलकी कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
कोनाळ मतदारसंघात साक्षी देसाई यांनी दाखवलेली जिद्द, संघर्ष आणि जनतेशी असलेले जवळचे नाते यामुळे त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल मानले जात आहे. विजय हुकला असला तरी त्यांनी मतदारांच्या मनात जिंकलेले स्थान कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!