उडान महोत्सवात शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयाचे यश

उडान महोत्सवात शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयाचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*उडान महोत्सवात शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयाचे यश*

*शिरगांव : संतोष साळसकर*

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उडाण महोत्सवात देवगड तालुक्यातील शिरगांव येथील पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उडाण महोत्सव ४ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथे पार पडला. या महोत्सवात पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रसाद सुहास कदम आणि मुकेश सुधीर जाधव यांनी व्दीतीय क्रमांक पटकाविला तर वक्तृत्व स्पर्धेत साक्षी प्रकाश शिद्रुक हिने तृतीय क्रमांक मिळविला या विद्यार्थ्यांना प्राचार्य समीर तारी,ॲकॅडमिक कोऑडीनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम, विस्तार कार्यशिक्षक प्राध्यापिका सुगंधा पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. कुणाल जाधव यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य आणि पथनाट्य स्पर्धेचे परीक्षक डॉ. विश्वंभर जाधव, कट्टा महाविद्यालयाचे संचालक अजय वराडकर, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, जिल्हा समन्वयक सुरेश पाटील, चंद्रकांत भेंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचेअध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संचालक, पदाधिकारी, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, प्राचार्य समिर तारी,सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!