दोडामार्गात महायुतीचा विजय

दोडामार्गात महायुतीचा विजय

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गात महायुतीचा विजय*

*दोडामार्ग .: शुभम गावस*

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत तालुक्यावर वर्चस्व कायम राखले आहे. जिल्हा परिषदेत मणेरीतून साक्षी तळवडेकर, साटेली–भेडशीमधून श्वेता धर्णे आणि माटणेतून दीपक गवस विजयी झाले.
पंचायत समितीत कोनाळमधून सायली निंबाळकर, मणेरीतून सोनिया नाईक/कुबल, माटणेतून पार्वती गवस, साटेली–भेडशीमधून संजय सातार्डेकर, झरेबांबरमधून स्नेहा गवस विजयी झाले असून गणेशप्रसाद गवस बिनविरोध निवडून आले. निकालानंतर महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!