सावंतवाडीत अपक्षांचा ‘धडाका’! दिग्गजांची धुळधाण, पण खरा ‘किंग’ कोण?

सावंतवाडीत अपक्षांचा ‘धडाका’! दिग्गजांची धुळधाण, पण खरा ‘किंग’ कोण?

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडीत अपक्षांचा ‘धडाका’! दिग्गजांची धुळधाण, पण खरा ‘किंग’ कोण?*

*​सावंतवाडी ः प्रतिनिधी*

जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना धोबीपछाड देत अपक्षांनी मारलेली मुसंडी सध्या चर्चेचा गरम विषय ठरली आहे.
​📊 निकालातील ‘अपक्ष’ शक्ती:
​जिल्हा परिषद: ९ पैकी ३ जागांवर अपक्ष विजयी.
​पंचायत समिती: १८ पैकी ५ जागांवर अपक्षांचा गुलाल
​बंडखोरी की रणनीती? निवडून आलेले बहुतांश अपक्ष हे महायुतीमधीलच बंडखोर आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी मिळवलेला विजय पक्षांतर्गत नाराजी स्पष्ट करत आहे.
​दिग्गजांना धक्का: महायुतीचे अनेक दिग्गज चेहरे या अपक्षांच्या लाटेत वाहून गेले आहेत.
​अदृश्य शक्तीचा हात? एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपक्ष निवडून येण्यामागे नक्की कोणाची ‘शक्ती’ आणि ‘रसद’ होती? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
​”सावंतवाडीत अपक्षांचा बोलबाला झाला असला, तरी या विजयाचे रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे आहे? अपक्षांचा हा विजय स्वतःच्या हिमतीवर की कोण्या ‘किंगमेकर’च्या इशाऱ्यावर?” या निकालामुळे आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक जनसंपर्क आणि पडद्यामागची फिल्डिंग भारी पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!