*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा मानस*
*सिधुदुर्गनगरी*
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा मानस आहे. याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यांचाच एक भाग म्हणुन दिनांक ०९ फेब्रुवारी २६आंगणेवाडी यात्रोत्सव तर दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी २६ या कुणकेश्वर यात्रोत्सव कालावधीत “प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव” संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये यात्रोत्सवात येणारे व्यापारी, भाविक यांनी सहाकार्य करावे असे आवाहन श्री. रविद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
आपला जिल्हा प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याकरीता प्रचार प्रसिध्दी व्हावी या हेतुने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन शालेय स्तरावर प्लास्टिक व ई वेस्ट संकलन स्पर्धा, मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र, शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रम, समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रोत्सव व कुणकेश्वर यात्रोत्सव प्रसिध्द यात्रोत्सव आहे. या कार्यक्रमांना लाखो भाविक, व्यापारी हजेरी लावत असतात. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात जैविक व प्लास्टिक कचरा तयार होत असतो.
दिनांक ९ फेब्रुवारी २६ आयोजित आंगणेवाडी यात्रोत्सव तर दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी २६ रोजी आयोजित कुणकेश्वर यात्रोत्सवात “प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव” संकल्पना राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालवण व देवगड यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये यात्रोत्सव काळात “प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव” म्हणुन बॅनर, वर्तनामपत्र, सोशल मिडिया आदीच्या माध्यमातुन व्यापक प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यात्रोत्सवात काळात मंदिर व मंदिर परिसरात कचरा कुंड्याचे नियोजन करण्यात येणार आहे. हॉटेल व फुड स्टॉल यांना जैविक व प्लास्टिक कचरा गोळा करण्याकरीता कचरा कुड्या किंवा निळा व हिरव्या रंगाच्या गारबेज बॅग पुरवठा करण्यात येणार असुन जमा होणारा कचरा त्यांनी एकत्र करुन ठेवावयाचा आहे. यात्रोत्सवाच्या ठिकाणी जैविक कचरा एकत्र करुन योग्य विल्हेवाट लावण्याकरीता ग्रामपंचायतईच्या माध्यमातुन ठिकठिकाणी तातपुरत्या स्वरुपाचे कंपोष्ट खड्डे तयार करण्यात येणार आहे.
यात्रोत्सवात येणा-या व्यापा-याकडून यात्रा करांप्रमाणे स्वच्छताकर व स्वच्छता डिपॉझिट आकारण्यात येणार आहे. सदर स्वच्छता डिपॉझिट व्यापा-याने आपल्याकडील जैविक व प्लास्टिक कच-याचे योग्य नियोजन केल्यास परत दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातुन नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असुन प्लास्टिक बंदी अधिनियमा प्रमाणे ज्या व्यापा-याकडे सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास दंडाची तरतुद करुन रितसर दंड आकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग वासिय, भाविक व व्यापारी यांनी आपला सिंधुदुर्ग प्लास्टिक मुक्त करण्याकरीता पुढाकार घेऊन दिनांक ०९फेब्रुवारी २६ आयोजित आंगणेवाडी यात्रोत्सव तर दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी २६ रोजी आयोजित कुणकेश्वर यात्रोत्सवात “प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव” करण्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री. रविद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
दिनांक ०९ फेब्रुवारी २६आयोजित आंगणेवाडी यात्रोत्सव तर दिनांक १५ ते १७फेब्रुवारी २६ रोजी आयोजित कुणकेश्वर यात्रोत्सवात येणा-या व्यापारी यांनी सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळुन पर्यायी वस्तुचा वापर करुन सहकार्य करावे. यात्रोत्सवात सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

