*कोंकण एक्सप्रेस*
*अणाव डिगस येथे मोबाईल व्हॅन द्वारे कायदेविषयक शिबिर आणि लोक अदालत*
*सिधुदुर्गनगरी*
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत न्याय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत असुन अणाव डिगस येथे मोबाईल व्हॅन द्वारे कायदेविषयकशिबिर आणि लोक अदालत घेण्यात आली
. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार दिनांक ०२/०२/२०२६ ते २८/०२/२०२६ या कालावधीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत “न्याय आपल्या दारी” या संकल्पनेतून मोबाईल लोक अदालत व फिरते विधी सेवा केंद्र या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक शिबीरे व मोबाईल लोक अदालत घेण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनचे उद्घाटन मा डॉ. सुधीर देशपांडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्यावेळी मा. श्री.एस.एस. इंदलकर तदर्थ् जिल्हा न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग, मा. श्री. ए. ए. चेंडके, दिवाणी न्यायाधीश व.स्तर व मुख्य न्यायदंडाधिकारी,सिंधुदुर्ग, मा. श्री. ए. जी. देशिंगकर, सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग, मा. श्रीमती एस.जे. पाटील, ३रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर व अति. मुख्यन्यायदंडाधिकारी, मा. श्रीमती. एस.डी. गुंडेवाडी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग तसेच न्यायालयीन कर्मवारी उपस्थित होते.
सदर मोबाईल व्हॅन डिगस ग्रामपंचायत येथे कायदेविषयक शिबीरासाठी नेण्यात आली. सदर शिबीरामध्ये ॲड. आर. एच. वागज, मुख्य लोक अभिरक्षक, सिंधुदुर्ग यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच ॲड. एस. एस. खुने, सहाय्यक लोक अभिरक्षक, सिंधुदुर्ग यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिले जाणाऱ्या सेवा व सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच मोबाईल व्हॅन लोक अदालत दिनांक ०३/०२/२०२६ रोजी अणाव ग्रामपंचायत येथे घेणेत आले. सदर मोबाईल व्हॅन लोक अदालतीसाठी मा. श्री. ए. ए. चेंडके, दिवाणी न्यायधीश (व.स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांनी पॅनेल प्रमुख व अॅड. श्रीमती निकिता हरकुळकर यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सदर मोबाईल व्हॅन लोक अदालतीत ३३ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी १ प्रकरण निकाल होऊन रक्कम रु. ८०,०००/- वसूल झालेले आहेत.

