भंडारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात 20 जणांचे रक्तदान

भंडारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात 20 जणांचे रक्तदान

*कोंकण एक्सप्रेस*

*भंडारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात 20 जणांचे रक्तदान*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुल्र्याच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 20 दात्यांनी रक्तदान केले.
रामघाट येथील श्री सातेरी मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.आनंद बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अंकिता बांदेकर, महेश राऊळ, सायली आंगचेकर, प्रा.दिलीप शितोळे, मंडळाचे संचालक आनंद केरकर व गजानन गोलतकर, आयटीआय संस्थेचे प्रा.डिसिल्वा, नाना राऊळ आदी उपस्थित होते. प्रा.डॉ.आनंद बांंदेकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदात्यांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन केले. दरम्यान, या उपक्रमाला नगरसेवक प्रणव वायंगणकर व पंचायत समितीचे सदस्य संकेत धुरी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ.सचिन परूळकर यांनी केले. तर आभार डॉ.जी.पी.धुरी यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी भंडारी ऐक्यवर्धक मंडळाच्या पदाधिका-यांनी तसेच गौरेश वायंगणकर, दिव्या वायंगणकर, सानिया सरमळकर व रक्तदात्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!