*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत निलेशजी राणेच्या प्रमुख उपस्थिती खळा बैठका*
*कणकवली : प्रतिनिधी*
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती विभागाची खळा बैठक कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती सातरल–कासरल येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार श्री. गुरुनाथ वरदेकर यांच्या प्रचारासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बिनविरोध निवडून आलेले पंचायत समिती सदस्य श्री. सोनू सावंत यांचा सत्कार करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रकाश सावंत, बिनविरोध पंचायत समिती सदस्य सोनू सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, रामदास विखाळे, सातरल सरपंच सविता मेस्त्री यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

