आज लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची  भव्य जाहीर सभा

आज लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा

*कोंकण एक्सप्रेस*

*आज लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा*

*कुडाळ : प्रतिनिधी*

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील कुडाळ हायस्कूल पटांगणावर होणाऱ्या शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भव्य जाहीर सभेच्या स्थळाची पाहणी कुडाळ मालवण चे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी केली.


या पाहणीदरम्यान सभेच्या नियोजनासंदर्भात सविस्तर आढावा घेत उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी आमदार श्री. रवींद्रजी फाटक, कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, श्री. राजेश मोरे, श्री. काका कुडाळकर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!