*कोंकण एक्सप्रेस*
*तेरवणमध्ये सायली निंबाळकर यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद; महायुतीचा विजयाचा आत्मविश्वास वाढला*
*दोडामार्ग: शुभम गवस*
तेरवण येथे महायुतीच्या उमेदवार सौं. सायली निंबाळकर यांनी घरोघरी जाऊन दमदार प्रचार केला. या प्रचार फेरीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत आपल्या विकासाच्या संकल्पना आणि आगामी योजना मांडल्या. त्यांच्या प्रचाराला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला.
या वेळी महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. सायली निंबाळकर यांच्यावरील विश्वास आणि त्यांना मिळणारा वाढता जनसमर्थन यामुळे मतदारसंघात महायुतीच्या विजयाच्या चर्चांना वेग आला आहे.
गावागावात संपर्क वाढवत सायली निंबाळकर मतदारांच्या समस्या जाणून घेत असून विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचार मोहिमेला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

