नव पीढीचा विश्वास – मेणेरीत सोनिया नाईक यांना वाढता प्रतिसाद

नव पीढीचा विश्वास – मेणेरीत सोनिया नाईक यांना वाढता प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*नव पीढीचा विश्वास – मेणेरीत सोनिया नाईक यांना वाढता प्रतिसाद*

*दोडामार्ग : शुभम गवस*

मेणेरी मतदार संघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून मतदारांमध्येही उत्सुकता वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोनिया नाईक (कुबल) यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आज कुडासे वानोशी येथे झालेल्या त्यांच्या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी आपले विकासाचे धोरण मांडले. स्थानिक प्रश्न सोडविणे, महिलांसाठी विविध योजना राबविणे तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
सोनिया नाईक यांच्या प्रचारामागे स्त्री शक्ती मोठ्या प्रमाणात उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. महिलांचा वाढता सहभाग त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बदल घडवण्याच्या उद्देशाने नवयुवक आणि नवयुवती देखील मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत.
गावागावात सुरू असलेल्या त्यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून मतदार संघात त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. जनतेशी साधलेला थेट संवाद, साधी राहणी आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मेणेरी मतदार संघातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलताना दिसत असून, सोनिया नाईक यांच्या प्रचारामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात त्यांचा प्रचार आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत असून मतदार संघात राजकीय वातावरण अधिक रंगत जाणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!