*कोंकण एक्सप्रेस*
*कोनाळ मतदारसंघ बदलाच्या तयारीत? अपक्ष उमेदवार सौं. साक्षीताई संदिप देसाई यांना वाढता जनसमर्थन..*
*दोडामार्ग: शुभम गवस*
कोनाळ मतदारसंघात बदल घडवण्याच्या तयारीचे चित्र सध्या दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार सौं. साक्षीताई संदिप देसाई या आपल्या प्रभावी नेतृत्वाच्या बळावर मतदारसंघात परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रवासाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
आज त्यांचा प्रचार मेढे, सोनावल आणि पाळये या भागांमध्ये पार पडला. अपक्ष उमेदवार असूनही साक्षीताई देसाई यांच्या बाजूने मतदारांचा कौल जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

