कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून साक्षीताई देसाई यांच्या विजयाची चर्चा

कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून साक्षीताई देसाई यांच्या विजयाची चर्चा

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून साक्षीताई देसाई यांच्या विजयाची चर्चा*

*दोडामार्ग: शुभम गवस*

कोनाळ पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष उमेदवार सौं. साक्षीताई संदीप देसाई यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा सध्या मतदारांमध्ये रंगू लागली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्यानंतरही त्यांनी स्वतःची छत्री ही निशाणी घरोघरी पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे केले आहे.
त्यांच्या प्रचाराला मिळणारा जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद आणि महिलांसह युवकांचा वाढता पाठिंबा यामुळे त्या एखाद्या मोठ्या पक्षाच्या उमेदवाराप्रमाणे दमदार लढत देताना दिसत आहेत. मतदारसंघात त्यांनी केलेल्या संपर्क मोहिमेमुळे साक्षीताई देसाई यांच्या बाजूने मतदारांचा कौल झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!