कोनाळ मतदार संघात पुन्हा चर्चेत सौं. साक्षी देसाई; “आपलीच लेक, आपलीच सून” म्हणत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोनाळ मतदार संघात पुन्हा चर्चेत सौं. साक्षी देसाई; “आपलीच लेक, आपलीच सून” म्हणत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळ मतदार संघात पुन्हा चर्चेत सौं. साक्षी देसाई; “आपलीच लेक, आपलीच सून” म्हणत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*दोडामार्ग : शुभम गवस*

कोनाळ मतदार संघात पुन्हा चर्चेत सौं. साक्षी देसाई; “आपलीच लेक, आपलीच सून” म्हणत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोनाळ मतदार संघातील अपक्ष उमेदवार सौं. साक्षी संदीप देसाई या सध्या प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत असून त्यांचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “आपलीच लेक, आपलीच सून” अशी ओळख निर्माण करत सौं. देसाई यांनी मतदारांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले असून हेवाळे गावातील त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या.
प्रचारादरम्यान सौं. देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास व्यक्त केला जात असून गावातील सर्व स्तरांतील नागरिक त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा, आपुलकीने संवाद साधण्याची पद्धत आणि सामाजिक कार्यातील सहभाग यामुळे मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत असल्याचेही चित्र दिसत आहे.
एकूणच, “आपलीच लेक, आपलीच सून” या भावनिक नात्याच्या आधारावर सौं. साक्षी देसाई यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असून मतदारांशी निर्माण झालेले हे जवळचे नाते आगामी निवडणुकीत त्यांना कितपत यश मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!