*कोंकण एक्सप्रेस*
*घोडगेवाडीत सायली निंबाळकर यांचा जोरदार प्रचार; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*दोडामार्ग: शुभम गवस*
घोडगेवाडी येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार सौं. सायली निंबाळकर यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांनी सायली निंबाळकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. प्रचारादरम्यान गावातील विविध भागांना भेट देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला व विकासकामांच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला अधिक वेग येत असल्याचे दिसून येत आहे.

