चाळेश्वर देवतेच्या आशीर्वादाने स्नेहा गवस यांच्या प्रचाराला वेग

चाळेश्वर देवतेच्या आशीर्वादाने स्नेहा गवस यांच्या प्रचाराला वेग

*कोंकण एक्सप्रेस*

*चाळेश्वर देवतेच्या आशीर्वादाने स्नेहा गवस यांच्या प्रचाराला वेग*

*दोडामार्ग: शुभम गवस*

आयनोडे, सरगवे आणि पाल या गावांमध्ये श्रीमती स्नेहा संजय गवस यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मतदारांशी थेट संपर्क साधत त्या घरोघरी भेटी देत असून, नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज श्रीमती स्नेहा गवस यांनी चाळेश्वर देवतेच्या चरणी लीन होत प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. देवतेचे आशीर्वाद घेत त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. गावागावांत भेटी देत त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या तसेच विकासाच्या विविध योजनांबाबत नागरिकांशी संवाद साधला.
त्यांच्या प्रचाराला महिला वर्ग, युवा वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झरेबां झरेबांबर मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली असून स्नेहा गवस यांच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण रंगतदार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!