*खासदार नारायण राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा; पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे फोंडाघाटवासियांना आवाहन*

*खासदार नारायण राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा; पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे फोंडाघाटवासियांना आवाहन*

*कोंकण एक्सप्रेस*

*खासदार नारायण राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा; पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे फोंडाघाटवासियांना आवाहन*

*फोंडाघाट-घोणसरी येथे महायुतीची जंगी सभा; मामा हळदिवे, मानसी मराठे आणि पवन भालेकर यांच्या विजयाचा निर्धार*

*​फोंडाघाट ः संजना हळदिवे*

“सिंधुदुर्ग जिल्हा परिषद गेली २७ वर्षे खासदार नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगती पथावर आहे आणि पुढेही राहील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केवळ महायुतीच करू शकते. त्यामुळे राणे साहेबांनी दिलेला शब्द आणि दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन राज्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी केले.
​फोंडाघाट आणि घोणसरी येथे आयोजित महायुतीच्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, संतोष कानडे, उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे, मानसी मराठे, पवन भालेकर, मनोज रावराणे, तालुकाप्रमुख दामू सावंत, माजी सरपंच राजू रावराणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​विरोधकांचा पत्ताच नाही; विकास फक्त महायुतीच करणार!
​पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, “उबाठा गटाचे उमेदवार प्रचारात कुठेही दिसत नाहीत, काही जण तर मतदारांना तोंड दाखवायलाही घाबरत आहेत. निवडणूक निकालानंतर निधीसाठी पुन्हा आमच्याकडेच यावे लागणार आहे. ही निवडणूक एकतर्फी झाली असून जनतेचा कल महायुतीकडेच आहे.”
​मामा हळदिवे: राणे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते
​उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे यांच्याबद्दल बोलताना ना. नितेश राणे म्हणाले, “१९९० पासून मामा हळदिवे राणे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते जनतेच्या सतत संपर्कात राहणारे कार्यकर्ते आहेत. फोंडाघाट मतदारसंघाला निधीची कमतरता भासू देणार नाही. ज्या मतदारसंघातून मला सर्वाधिक लीड मिळेल, तिथे पहिल्या टप्प्यात १ कोटींचा निधी जाहीर करेन.”
​’हृदयात कोरलेलं नातं कधीही पुसता येत नाही’ – मामा हळदिवे
​यावेळी उमेदवार मामा हळदिवे यांनी भावूक होत मतदारांना साद घातली. “मी आणि माझ्या कुटुंबाने आजवर स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेतले आहे. खासदार नारायण राणे साहेबांशी असलेली माझी निष्ठा कधीही ढळली नाही. ही उमेदवारी माझी नसून तुमची आहे. वहीवरचे लिहिलेले खोडता येते, पण हृदयात कोरलेले प्रेम कधीही पुसता येत नाही,” असे सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

संजय आंग्रे (शिवसेना उपनेते): “राणे साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येईल आणि सभापतीही महायुतीचाच होईल. बबन मामा तळागाळातील माणसांच्या हृदयात आहेत.”
​तुळशीदास रावराणे: “राणे साहेबांनी विकासाचा जो धडा घालून दिला आहे, तोच वारसा पालकमंत्री नितेश राणे पुढे नेत आहेत. धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरचे बटन दाबून महायुतीला विजयी करा.”
​या सभेला फोंडाघाट आणि घोणसरी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!