सिंधुदुर्गात ‘मशाल’ विझणार, ‘कमळ’ फुलणार! सतीश सावंतांचा आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सिंधुदुर्गात ‘मशाल’ विझणार, ‘कमळ’ फुलणार! सतीश सावंतांचा आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात ‘मशाल’ विझणार, ‘कमळ’ फुलणार! सतीश सावंतांचा आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातून आज एक सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री नितेश राणे यांनी उबाठा गटाला दिलेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
​राजकीय समीकरणे बदलणार
​सतीश सावंत यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. मात्र, आता तेच सावंत राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याने कणकवली मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!