माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेचा धडाकेबाज डाव; गोरगरिबांचा कैवारी बाबुराव धुरी रणांगणात..

माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेचा धडाकेबाज डाव; गोरगरिबांचा कैवारी बाबुराव धुरी रणांगणात..

*कोंकण एक्सप्रेस*

*माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेचा धडाकेबाज डाव; गोरगरिबांचा कैवारी बाबुराव धुरी रणांगणात..*

*दोडामार्ग: शुभम गवस*

माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट)कडून धाडसी, अनुभवी आणि गोरगरीब जनतेचा खंबीर आधार म्हणून ओळखले जाणारे बाबुराव धुरी यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. राजकारणात ठाम भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि लोकांसाठी झटणारे नेतृत्व अशी ओळख असलेले बाबुराव धुरी हे या मतदारसंघात विश्वासाचे नाव बनले आहे.
सामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे, “हाकेला धावणारे नेतृत्व” म्हणून त्यांची तालुकाभर ख्याती आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत हवी असो, सामाजिक प्रश्न असो वा प्रशासनाशी संबंधित अडचणी असोत—बाबुराव धुरी यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे “मदतीचं एकच नाव – बाबुराव धुरी” अशी भावना मतदारांमध्ये रुजलेली दिसून येते.
वर्षानुवर्षे केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांशी घट्ट नातं निर्माण केलं आहे. गरीब, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत. राजकारणाकडे केवळ सत्तेचे साधन न मानता, समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.
शिवसेना (ठाकरे गट)च्या विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करणारे बाबुराव धुरी हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारे नेते मानले जातात. त्यामुळे माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील ही निवडणूक अधिक चुरशीची होत असून, बाबुराव धुरी यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
येणाऱ्या काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि लोकाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या लढतीला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!