*कोकण Express*
*राज्यात उद्यापासून १५ दिवस कडक “लाॅकडाऊन”..?*
*मंत्रिमंडळाचा निर्णय ; दहावीच्या परीक्षा रद्द,मात्र बारावीच्या परीक्षा होणार*
*मुंबई,ता.२०:*
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता उद्यापासून पंधरा दिवस कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.याबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील,अशी अपेक्षा आहे.दरम्यान या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर बारावीची परीक्षा होणारच असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. उद्यापासून राज्यात कडक लाॅकडाऊन करण्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.यावेळी उपस्थित मंत्र्यांनी लाॅकडाऊन गरजेचे आहे आणि ते १५ दिवसाचे करावे,अशी मागणी लावून धरली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.