*कोंकण एक्सप्रेस*
*संघर्ष, सेवा आणि जनतेचं प्रेम – साक्षी देसाई ठरतायत आशेचा किरण..!*
*दोडामार्ग: शुभम गवस*
आयनोडे-हेवाळे गावच्या प्रथम नागरिक तथा कोनाळ मतदार संघातील अपक्ष उमेदवार सौं. साक्षी देसाई यांचा प्रचार सध्या भावनिक आणि जनमानसाला भिडणारा ठरताना दिसत आहे.
समाजासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. अनेक अडचणींना सामोरे जात, संघर्षातून उभ्या राहिलेल्या साक्षी देसाई आज पुन्हा जनतेच्या आशीर्वादावर विश्वास ठेवत अपक्ष उमेदवारीची धुरा खांद्यावर घेतली आहे.
गावागावात फिरताना त्यांना मिळणारा महिलावर्गाचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि सर्वसामान्य जनतेचे प्रेम हे त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. साक्षी देसाई या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासामुळे मतदार संघात स्त्रीशक्ती एकवटताना दिसत असून त्यांच्या विजयासाठी जनतेची भावनिक साथ मजबूत होताना दिसत आहे.**

