शिरगांव येथे 1 फेब्रु. रोजी नाट्यमहोत्सव

शिरगांव येथे 1 फेब्रु. रोजी नाट्यमहोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगांव येथे 1 फेब्रु. रोजी नाट्यमहोत्सव*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध नाट्य संस्था मित्र शिरगाव यांचा २६ वा नाट्य महोत्सव रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी होतो. आहे.
देवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे सुपुत्र जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक कै. श्री रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस हा महोत्सव अर्पण आहे. यंदा एक दिवसीय नाट्य महोत्सव असून नाट्य रसिकांसाठी चार एकांकिकांचा संच सादर होणार आहे. यात सादर होणाऱ्या एकांकिका खालील प्रमाणे -. विद्या मंदिर हायस्कूल कणकवली निर्मित पडीक (बाल एकांकिका), एस. एम. हायस्कूल प्राथमिक विभाग कणकवली प्रस्तुत पांडुरंग नागू आणि सावतोबाचा (बाल एकांकिका), शिरगाव हायस्कूल आणि मित्र शिरगाव निर्मित थोर तुझे उपकार (बाल एकांकिका), मित्र शिरगाव निर्मित आईतवार (खुला गट).
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक होतकरू बालकलाकारांना, शाळा व नाट्य संस्थांना प्रोत्साहन पाठिंबा व आशीर्वाद देण्यासाठी व कै. श्री रघुनाथ कदम यांना आदरांजली वाहण्यासाठी नाट्यमाहोत्सवला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकका नी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!