*कोंकण एक्सप्रेस*
*बॅ.खर्डेकर महाविद्यालयात 13 रोजी वक्तृत्व स्पर्धा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्यावतीने ग्रंथालय उपक्रमांतर्गत शिवजयंती निमित्त 13 फेब्राुवारी रोजी तिन गटांमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा महाविद्यालयात सकाळी 9 वाजता होणार आहे.
शालेय गटासाठी (इ.7वी पर्यंत) “छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवला असून स्पर्धकाने 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले विचार मांडावयाचे आहेत. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 1000, 700, 500 तसेच उत्तेजनार्थ 250ची दोन बक्षिसे आणि चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. शालेय गट इ. 8वी ते 10वीसाठी “राजमाता पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर’ हा विषय ठेवला असून स्पर्धकाने 6 ते 7 मिनिटांमध्ये आपले विचार मांडावयाचे आहेत. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 1500, 1100, 700, उत्तेजनार्थ 500 व 300 ची रोख तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील खुला गट इ. 11वीपासून पुढील सर्वांसाठी “शिवरायांची जलनीती : 21व्या शतकातील भारताची सागरी सुरक्षा आणि सामथ्र्य’ हा विषय ठेवला असून स्पर्धकाने 8 ते 10 मिनिटांमध्ये आपले विचार मांडावयाचे आहेत. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 2000, 1500, 1000, उत्तेजनार्थ 700 व 500 अशी रोख तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांनी डॉ.सचिन परूळकर (9421238053) यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांनी केले आहे.

