कोनाळ मतदार संघात ‘साक्षीताई’ म्हणून नविन वादळ

कोनाळ मतदार संघात ‘साक्षीताई’ म्हणून नविन वादळ

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळ मतदार संघात ‘साक्षीताई’ म्हणून नविन वादळ*

*दोडामार्ग: शुभम गवस*

कोनाळ मतदार संघात अपक्ष उमेदवार साक्षी देसाई या “साक्षीताई” म्हणून वेगाने लोकप्रिय होत असून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. विविध अडचणी व घडलेल्या घटनांवर मात करत त्यांनी जनसंपर्कावर भर दिला असून सामान्य जनतेतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पक्षाचा पाठिंबा नसतानाही साक्षीताई यांनी घराघरात जाऊन लोकांच्या समस्या ऐकण्यावर भर दिला आहे. त्यांच्या साध्या, संयमी आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. गावोगावी भेटी, बैठका आणि संवाद यामधून त्या आपला प्रचार प्रभावीपणे करत आहेत.
अपक्ष उमेदवार असूनही वाढता जनसमर्थन आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता कोनाळ मतदार संघात साक्षीताई यांचे राजकीय समीकरण मजबूत होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!