*कामाच्या बळावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे -अपक्ष उमेदवार राजन म्हापसेकर !*

*कामाच्या बळावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे -अपक्ष उमेदवार राजन म्हापसेकर !*

*कोंकण एक्सप्रेस*

*कामाच्या बळावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे -अपक्ष उमेदवार राजन म्हापसेकर !*

*दोडामार्ग: शुभम गवस*

राजकारणात दरवेळी अनेक नवीन चेहरे समोर येत असतात. काही जण पक्षाच्या बळावर पुढे येतात, तर काही जण स्वतःच्या विचारसरणी, प्रामाणिक काम आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे माटणे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजन म्हापसेकर.
राजन म्हापसेकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माटणे मतदारसंघातील सामाजिक, शैक्षणिक तसेच विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गावागावात जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी राजन म्हापसेकर यांना मिळणारा जनसंपर्क आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसतानाही केवळ आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी मतदारसंघात भक्कम जनाधार निर्माण केला आहे. त्यांच्या प्रचारसभांना तसेच घरभेटींना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
राजन म्हापसेकर हे शांत, संयमी आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील विकासासाठी ठोस नियोजन आणि पारदर्शक कारभार देण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे ते प्रचारादरम्यान सांगत आहेत.
सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात राजन म्हापसेकर यांना मिळणारा वाढता प्रतिसाद आणि जनतेचा विश्वास पाहता आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाला मतदार पसंती देतील का, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!