*कोंकण एक्सप्रेस*
*मतदारांशी थेट संवाद, प्रचारात आघाडी ; स्नेहा गवस यांचे वजन वाढले..*
*दोडामार्ग: शुभम गवस*
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार श्रीमती स्नेहा संजय गवस यांच्या प्रचाराला सध्या प्रचंड वेग आला असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात जोरदार जनसंपर्क सुरू केला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावोगावी, वाडी-वस्तीवर भेटी देत त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. सामान्य जनतेच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेत त्या विश्वासाचे नाते निर्माण करताना दिसत आहेत.
प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचा वाढता सहभाग तसेच कार्यकर्त्यांमधील जोश पाहता स्नेहा गवस यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालला आहे. त्यांच्या साध्या, संयमी आणि आपुलकीच्या शैलीमुळे महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या वेगवान आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकीत श्रीमती स्नेहा संजय गवस यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीला मिळणारा जनतेचा पाठिंबा आणि उमेदवाराची सक्रियता यामुळे हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

