*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्ह्यातील भाजपाच्या २३ पदाधिकारी कार्यकर्त्याचे सहा वर्षासाठी निलंबन -प्रभाकर सावंत*
*सिधुदुर्गनगरी*
जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे/विरोधी उमेदवाराला मदत करणे अश्या प्रकारच्या पक्ष विरोधी कारवाई केल्याबदल खालील पदाधिकारी/कार्यकर्ते यांना भारतीय जनता पार्टी पक्षा मधुन ६ वर्षासाठी तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्या आहेत या निवडणुकीत भाजपा पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत तरीही काही उमेदवाराने अपक्ष उमेदवारी ठेवून पक्षशिस्तनमंता आपली उमेदवारी ठेवल्यामुळे जिल्ह्यातील 23 भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहा वर्षासाठी निलंबन करण्याबाबतचे भाजपाच्या वरिष्ठ पक्षसृष्टीने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण सहा वर्षासाठी ही निलंबन कारवाई केल्याचे ते म्हणाले
यामध्ये श्री. राजन बाळकृष्ण चिके, फोंडा ता. कणकवली,. श्री. राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर, कोनाळकट्टा ता. दोडामार्ग. श्रीम. सुजाता अजित पडवळ, तुळस ता. वेंगुर्ला., श्रीम. वंदना किरण किनळेकर, म्हापण ता. वेंगुर्ला. ,श्री. विजय महादेव रेडकर, मातोंड ता. वेंगुर्ला., श्री. जनार्दन रुक्मानंद कुडाळकर, आडेली ता. वेंगुर्ला. ,श्री. डायगो (मायकल) फ्रान्सिसी डिसोजा कोलगाव, ता. सावंतवाडी. श्री. जितेंद्र पांडुरंग गावकर, माजगाव ता. सावंतवाडी. श्री. योगेश अशोक केणी, इन्सुली ता. सावंतवाडी. श्री. स्वागत रघुवीर नाटेकर इन्सुली ता. सावंतवाडी,श्री. नितीन एकनाथ राऊळ इन्सुली ता. सावंतवाडी. श्रीम. शर्वाणी शेखर गावकर आरोंदा ता. सावंतवाडी,१३. श्री. उल्हास उत्तम परब सातार्डा ता. सावंतवाडी,१४. श्रीम. स्नेहल संदीप नेमळेकर आरोंदा ता. सावंतवाडी,१५. श्रीम. साक्षी संदीप नाईक ता. दोडामार्ग,१६. श्रीम. सुप्रिया शैलेश नाईक ता. दोडामार्ग,१७. श्रीम. सुनीता कमलाकर भिसे ता. दोडामार्ग,१८. श्री. प्रवीण नारायण गवस ता. दोडामार्ग,१९. श्री. अनिरुद्ध फाटक ता. दोडामार्ग,२०. श्रीम. सोष्मिता अरविंद बांबर्डेकर ओरोस ता. कुडाळ,२१. श्री. योगेश राजाराम तावडे ओरोस ता. कुडाळ,२२. श्री. रुपेश अशोक पावसकर नेरूर ता. कुडाळ,२३. श्री. विजय वासुदेव नाईक आडेली ता. वेंगुर्ला आदींचा समावेश आहे.

