सामाजिक कार्यकर्ते दीपक इस्वलकर यांच्या मातृश्रींचे निधन

सामाजिक कार्यकर्ते दीपक इस्वलकर यांच्या मातृश्रींचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*सामाजिक कार्यकर्ते दीपक इस्वलकर यांच्या मातृश्रींचे निधन*

*फोंडाघाट प्रतिनिधी :संजना हळदीवे*

फोंडाघाट गावातील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे आणि आरोग्य विभागात कार्यरत असलेले श्री. दीपक इस्वलकर यांच्या मातृश्रींचे आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने इस्वलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​मातृश्रींचे वय आणि त्यांच्या पश्चात असलेला मोठा परिवार, नातवंडे असा सर्व गोतावळा मागे सोडून त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या मुलाला समाजसेवेचे आणि जनसेवेचे बाळकडू देणाऱ्या एका खंबीर माऊलीच्या निधनाने सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
​स्वर्गीय माऊलींच्या पार्थिवावर उद्या सकाळी 8:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
​ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि इस्वलकर परिवाराला या कठीण काळातून सावरण्याचे बळ देवो. हीच भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!