*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय सार्वजनिक श्रद्धांजली!*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली आहे. प्रशासनावर पकड असणारा एक धडाडीचा लोकनेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, कणकवली शहरात आज गुरुवार, दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सार्वजनिक शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
📍 स्थळ: पटवर्धन चौक, कणकवली शहर
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश भास्कर पारकर यांनी आवाहन केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, कायदेतज्ज्ञ आणि पत्रकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी या शोकसभेत सहभागी व्हावे.
अजितदादांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी कणकवलीतील सर्व नागरिक आणि दादाप्रेमींनी मोठ्या संख्येने पटवर्धन चौक येथे उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
विनम्र आवाहन:
संदेश भास्कर पारकर
नगराध्यक्ष, कणकवली नगरपंचायत

